मुंबई : प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Actor Ramesh Deo) यांचे ( 93 वर्ष) २ फेब्रुवारी रोजी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालय मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन (passed away) झाले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त केला जात आहे. त्यात मराठमोळा प्रसिध्द अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Marathi actor Siddharth Jadhav) एक भावनिक व्हिडीओ शेअर केले आहे.
सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिध्दार्थ जाधवने रमेश देव यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये ज्येष्ठ रमेश देव यांच्या हस्ते त्यास पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा व्हिडीओ शेअर करत त्याने “तुमचे आशीर्वादरूपी शब्द नेहमीच माझ्या पाठीशी राहतील..भावपूर्ण श्रध्दांजली” अशा ओळी लिहिल्या आहेत.
https://www.instagram.com/tv/CZgDmpSp6Q-/?utm_medium=copy_link
तसेच त्यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त करताना सिद्धार्थ म्हणाला, मला विश्वासच बसत नाही की रमेश काका आज आपल्यासोबत नाहीत. मी त्यांना अलीकडेच त्यांच्या ‘आनंद’ या बॉलिवूड (Bollywood film ‘Anand’) चित्रपटातील गाण्यावर सादर केलेल्या एका टेलिव्हिजन शोमध्ये भेटलो होतो. त्यांना पाहणं खरोखरच प्रेरणादायी होतं. या वयात कामगिरी करत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी कमेंट करून श्रध्दांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वच स्तरातून त्यांच्या कुटूंबियांना सांत्वना देण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी…”,पडळकरांचे ट्वीट ठरतेय चर्चेचा विषय
- शैक्षणिक व आर्थिक क्रांती घडवून छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित शिवजयंती साजरी करू-विनोद पाटील
- SSC-HSC Board Exams: दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार ; राज्य शिक्षण मंत्रिमंडळाचा निर्णय
- पुणे महानगरपालिकेच्या नवीन प्रारूप आराखड्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोमात
- रोजगार हमी योजनेतून बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल-राज्यमंत्री अब्दुल सत्तार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

