मुंबई: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी निगडीत वादांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नुकतेच गांगुली यांचे टीम मीटिंगमध्ये उपस्थित राहण्याबाबत वाद उद्भवला होता. त्याच संबंधी एक मोठा खुलासा सिलेक्शन कमिटीच्या सदस्याने केले होते.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीसोबत यासंबंधी खुलासा करताना सदस्य म्हणाले , “ जे आहे ते आहे. तुम्ही तुमच्या बॉसची तक्रार नाही करू शकत. हो ना ? त्यांनी सिलेक्शन मध्ये कधीही हस्तक्षेप केले नाही. मात्र त्यांची तिथली उपस्थिती भीतीदायक होती. कारण ते बीसीसीआय अध्यक्ष आहेत. पण त्याबद्दल मी अधिक बोलू शकत नाही.” सौरव गांगुली जबरदस्तीने सिलेक्शन मिटिंग मध्ये सहभागी होत असल्याचे सांगितले जात होते.
बीसीसीआयच्या नियमानुसार अध्यक्षांना टीम इंडियाच्या सिलेक्शन मिटिंगमध्ये सहभागी होण्याचा अधिकार नाही. तर, समितीचे संयोजक असल्याने सचिव बैठकांना उपस्थित राहतात. अशा स्थितीत सिलेक्शन मिटिंगमध्ये गांगुलीची उपस्थिती सिलेक्टर्सच्या निर्णयावर प्रभाव टाकू शकते असे सगळ्यांचे मत आहे. एकूणच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- “ते भावनेच्या भरात आरोप…”; रणजित डिसलेंचे स्पष्टीकरण
- भारतीय क्रिकेट संघातील कोरोना विस्फोटामुळे नवीन क्रिकेट खेळाडूला संधी
- “राहुल गांधींचे विधान म्हणजे नीच टूलकिटच्या पुढच्या प्रवृत्तीच्या आंदोलनाची प्रस्तावना तर नव्हे?”
- “अर्णव गोस्वामीला घरातून उचलून आणताना परमबीर सिंह गळ्यातले ताईत होते आता खंडणीचे आरोपी झाले?”
- रोजगार हमी योजनेतून बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल-राज्यमंत्री अब्दुल सत्तार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

