🕒 1 min read
मुंबई: वाईनव्यवसायाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांची मुलगी संचालक असलेल्या कंपनीत भागीदार असलेले सुजित पाटकर यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवरच संजय राऊत यांनी पुष्पा स्टाईल ट्वीट केले आहे. तसेच हे ट्वीट त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना टॅग केले आहे.
“अगोदर लालच दिली, ऑफर्स दिल्या. नंतर धमकावले गेले. घाबरवण्यात आले. तेव्हा पण आम्ही झुकलो नाही, मग परिवाराला धमकावले गेले. आम्ही म्हटले, सोडून द्या. त्याला कानाडोळा केला. तर आता सेंट्रल एजेंसीला आमच्या मागे लावले गेले. चालतंय..२०२४ पर्यंत हे चालत राहणार…पण आम्ही झुकणार नाही!”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
दरम्यान संजय राऊत यांची अशोक गर्ग कंपनीसोबत भागीदारी असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणात संजय राऊत यांच्या मुलींचाही समावेश असल्याचे म्हटले जात आहे. तर आज सुजित पाटकर यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे.
पहले लालच दिया गया, ऑफर्स दिए । फिर डराया , धमकाया गया। तब भी झुका नहीं तो
परिवार को धमकाया गया।
हमने कहा- छोड़ दो, नजरअंदाज करो इन्हें, जाने दो। तो अब सेंट्रल एजेंसी को हमारे पीछे लगा दिया।
चलता है, 2024 तक चलेगा भी..पर हम झुकेंगे नहीं!@MamataOfficial @uddhavthackeray pic.twitter.com/JYHNrHOF7o— Sanjay Raut (@rautsanjay61) February 3, 2022
तसेच ईडीने गोरेगावमधील एका भूखंडाच्या फसव्या एफएसआय विक्रीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी प्रवीण राऊत यांनाही अटक केली आहे. प्रवीण राऊत हे एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक असून त्यांच्या पत्नी माधुरी यांनी २०१० मध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे यंत्रणेच्या तपासात समोर आले होते. त्यांना अटक झाली असून आता सुजित पाटकर यांचीही चौकशी केली जात आहे.
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचे ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे. या सरकारमध्ये राजकीय विरोधकांचे नातेवाईक, आप्तीष्ट यांच्यावर कारवाई होतच असतात. आणि आमच्या सारखे लोक नेहमी सहन करत असतात.राजकीय सुड बुद्धीच्या या कारवाया २०२४ पर्यंत आम्ही सहन करु. त्यांचा सर्च आमच्याभोवती सुरु आहे. मी त्यांना विचारतो कुछ मिला क्या? त्यामुळे हा एक खेळ सुरु आहे. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “.. पण त्यांची उपस्थिती भीतीदायक” टीम सिलेक्शन मिटिंगसंबंधी गांगुलीबाबत पुन्हा खुलासा
- “तुमचे आशीर्वादरूपी शब्द नेहमीच..”; सिध्दार्थने देव यांच्या आठवणींना दिला उजाळा
- ‘सुपारीबाज’ आमदार; नितेश राणेंवर आणखी एक आरोप
- “ते भावनेच्या भरात आरोप…”; रणजित डिसलेंचे स्पष्टीकरण
- भारतीय क्रिकेट संघातील कोरोना विस्फोटामुळे नवीन क्रिकेट खेळाडूला संधी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
