🕒 1 min read
मुंबई: मुंबई महानगरपालिकेचा 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा शैक्षणिक अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित कुंभार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. 3370.24 कोटींच्या या अर्थसंकल्पात डिजीटल शिक्षणावर भर देण्यात आला आहे.तसेच विद्यार्थ्यांना मसूर डाळ, हरभरे आणि तांदूळ वाटप देखील करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित कुंभार यांनी जाहीर केलेल्या या शैक्षणिक अर्थसंकल्पात ३३७०.२४ कोटींची तरतूद केली आहे. यात प्रामुख्याने डिजीटल शिक्षणावर भर देण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिकेने डिजीटल शिक्षणासाठी 27 कोटींची तरतूद केली आहे. तसेच विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढवण्यासाठी शाळेत बोलक्या संरक्षक भिंती निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना हरभरे, मसूरडाळ आणि तांदूळही पुरवण्यात येणार आहे. या योजनेचा सर्वच विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. मुलींसाठी उपस्थिती भत्ता आणि सर्व विद्यार्थ्यांना बसचा मोफत प्रवास मिळावा म्हणूनही या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पात कोणत्याही नव्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. आहे त्या योजना सुरू ठेवण्यावर आणि शालेय प्रकल्प मार्गी लावण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. तसेच इयत्ता दहावीच्या 19401 विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी 7 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी मोफत वस्तू देण्यात येणार आहेत. त्यात वह्या गणवेश, बुट-मोजे स्टेशनरी, सँडल, स्कूल किट, कॅनव्हास शूज व स्पोर्ट्स युनिफॉर्म आदींचा समावेश आहे. त्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला मिळून 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्राथमिक शाळेतील मुलींच्या उपस्थिती प्रोत्साहन भत्त्यासाठी 7 कोटी 2 हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- देशाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थसंकल्पात काय ?
- “…तर मानसिक संतुलन बिघडतं”, नवाब मलिकांच्या टीकेवर मोहित कंबोज यांचे प्रत्युत्तर
- पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एकला चलो रे चा नारा ??
- “काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं”; राज ठाकरे निवडणुकीसाठी सज्ज
- ‘अर्थसंकल्पाचा संदेश गावोगावी पोहोचवणार’; चंद्रकांत पाटलांचे विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
