Share

पैठण तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडून तातडीने जेरबंद करण्याचे निर्देश

Published On: 

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात बिबट्याने धुमाकुळा घातला असताना आता औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात मानवी वस्त्यांमध्ये व शेतात घुसून धुमाकूळ घातला आहे. या धुमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला पकडून तातडीने जेरबंद करण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले.

बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्यासंदर्भात रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी वनमंत्री राठोड यांची प्रत्यक्ष भेट घेतली. याची तातडीने दखल घेत वनमंत्री संजय राठोड यांनी विधान भवनात बैठक घेतली व हे निर्देश दिले.

पैठण तालुक्यात काही दिवसांपासून एका बिबट्याने धुमाकूळ घातला असून त्याच्या हल्ल्यात आतापर्यंत एक वयोवृद्ध आणि त्यांच्या नातवाचा मृत्यू झाला. तसेच काही जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. या पार्श्वभूमीवर या भागात तातडीने पथके नेमावीत, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे, ट्रॅप कॅमेरे, थर्मल कॅमेरे लावण्यात यावे तसेच आजूबाजूच्या जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमधूनही अतिरिक्त पथके व रसद मागविण्यात यावी, असे निर्देशही वनमंत्री राठोड यांनी दिले .

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!