Share

मोदी सरकारने स्वयंपाक गॅसची किंमत वाढवून सामान्य माणसाला अडचणीत आणण्याचे पाप केले : राष्ट्रवादी

Published On: 

मुंबई : देशातील कोरोनाचा कहर तुलनेने कमी झाला असला, तरी इंधन दरवाढीचा कहर मात्र आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.मागील १५ दिवसांमध्ये केंद्रातील भाजपा सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये १०० रुपयांनी वाढ केली आहे. घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. तर पाच किलोच्या गॅसच्या किंमती १८ रुपयांनी वाढवल्या आहेत. त्याचप्रमाणे १९ किलो सिलिंडरसाठी आता ३६.५० रुपये जास्त मोजावे लागणार आहे.

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणाऱ्या आयओसीने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये आता १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडर ६४४ रुपयांना झाला असून कोलकात्याने तो ६७०.५० रुपये तर मुंबईत ६४४ रुपयांपर्यंत पोहचला आहे. चेन्नईमध्ये गॅस सिलिंडरसाठी ६६० रुपये मोजावे लागत आहेत.

दरवाढ होण्याआधी दिल्लीमध्ये १४.२ किलो गॅस सिलिंडरचे दर ५९४ रुपये इतके होते. कोलकात्यामध्ये ६२०.५० रुपये तर मुंबईमध्ये ५९४ रुपयांना गॅस सिलिंडर मिळायचा. मात्र आता यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार असणाऱ्या सर्वासामान्यांच्या खिशाला या दरवाढीची झळ बसणार आहे.

१९ किलोच्या सिलिंडरची दिल्लीमधील किंमत एक हजार २९६ रुपये, कोलकात्यामध्ये एक हजार ३५१ रुपये ५० पैसै, मुंबईमध्ये एक हजार २४४ रुपये आणि चेन्नईमध्ये एक हजार ४१० रुपये ५० पैशांपर्यंत गेली आहे. गॅस सिलिंडरवर देण्यात येणाऱ्या सबसिडी अंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी १२ गॅस सिलिंडरवर सूट देते. ग्राहकांना या कालावमध्ये अधिक सिलिंडर लागले तर त्यांना बाजार भावात ते विकत घ्यावे लागतात.

कोरोना च्या काळात सामान्य माणसाला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकारने १५ दिवसाच्या आत दोन वेळा स्वयंपाक गॅसची किंमत वाढवून सामान्य माणसाला अडचणीत आणण्याचे पाप केले आहे. एकीकडे लोकांना नोकऱ्या नाहीत, व्यापार व कारखानदारी उद्ध्वस्त झाली आहे अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याच्या ऐवजी मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व स्वयंपाक गॅस ची किंमत वाढवून सामान्य जनतेला अडचणीत अन्याचे काम केलं आहे. स्वयंपाक गॅस मध्ये पंधरा दिवसात दोन वेळा एकूण शंभर रुपयाची केलेली दरवाढ ही मोदी सरकारने तात्काळ रद्द करावी अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!