Share

‘हा’ मातब्बर नेता करणार अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जोरदार इनकमिंग पहातायला मिळत आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर आता जनसुराज्य पक्षाचे नेते, हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे हे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. प्रवेशाचा कार्यक्रम ठाकरसे हाऊस, बल्लार्ड इस्टेट मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयांमध्ये संपन्न होईल.

राजीव आवळे यांच्यासोबत इचलकरंजी नगर परिषदेचे सदस्य अब्राहम आवळे, माजी जिल्हा परिषद सदस्या स्मिता आवळे, वडगाव नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा लता सूर्यवंशी यांचादेखील प्रवेश होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!