Share

धक्कादायक ! सांडपाण्यात कोरोनाचा शिरकाव आयसीएमआरचा अहवाल

Published On: 

मुंबई: गेल्या वर्षभरापासून जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या बळींच सत्र सुरूच आहे. याच कोरोना विषाणू बद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता पर्यंत केवळ माणसांमध्ये संपर्कातून संसर्ग होणार्या विषाणूने नवीन रूप धरण केले आहे.

मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही शहरातील काही भागांतील सांडपाण्यामध्ये करोना विषाणूचे अंश सापडले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) ११ ते २२ मे २०२० या कालावधीत गोळा केलेल्या नमुन्यांच्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे.

मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही शहरातील काही भागांतील सांडपाण्यामध्ये करोना विषाणूचे अंश सापडले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) ११ ते २२ मे २०२० या कालावधीत गोळा केलेल्या नमुन्यांच्या अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. त्यात धारावीसह सहा विभागांतील सांडपाण्याच्या नमुन्यांचा समावेश आहे. मात्र, या प्रकारे सांडपाणी वा गटाराच्या पाण्यात करोनाचे संसर्ग आढळल्यास मानवाला कोणताही धोका नसल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबईत मार्च अखेरीपासून करोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने ११ ते २२ मे या कालावधीत मुंबईतील धारावी, कुर्ला, शिवाजीनगर, मालाड, कांजुरमार्ग, वडाळा अशा सहा विभागांतील सांडपाण्यातील नमुने गोळा करून त्यांचे शास्त्रीय पृथक्करण केले. त्या अहवालातील निष्कर्ष मुंबईकरांसाठी धडकी भरविणारे आहेत. करोनाचे विषाणू सांडपाण्यातही सापडल्याने आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

मार्चमध्ये गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये असे कोणतेही विषाणू आढळले नव्हते. यासंदर्भात मुंबई पालिका अधिकाऱ्यांनी सांडपाण्यात आढळणारे विषाणू मानवी जीवास धोकादायक नसल्याचे नमूद केले आहे. सांडपाण्यात सापडणाऱ्या विषाणूचा मानवाशी थेट संपर्क येत नसल्याचेही सांगण्यात येते. सांडपाणी हे विनाप्रक्रिया समुद्रात जात असल्याने कोणताही धोका निर्माण होत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

मात्र याचा मलनि:सारण प्रक्रिया केंद्रातील कर्मचाऱ्यांनाही तसा कोणताही धोका निर्माण होणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. पालिका कर्मचाऱ्यांची नियमित पद्धतीने करोना तपासणी होत असते. त्यामुळे वेळीच उपाय करता येत असल्याचे अधिकारी स्पष्ट करतात. तसेच, सांडपाणी वापरात येत नसल्याने मुंबईकरांना कोणताही धोका नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. मात्र आता मुंबई सह सर्वत्र कोरोनाच्य या नवीन शिरकावामुळे धोक्याची घंटा ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!