Share

आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘गोड बातमी’ मिळण्याची शक्यता

Published On: 

नवी दिल्ली : देशभरात शेतकरी आंदोलनाचे लोन देशभरात पोहचले आहे. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय होणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत भरपाईबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.आजच्या बैठकीत साखरेच्या निर्यातीवर 3600 कोटींची सबसिडी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना ऊर्वरीत रक्कम देण्याचाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केंद्र सरकार आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत भरपाईबाबत निर्णय घेऊ शकते. अन्न मंत्रालयाने 2020-21च्या मार्केटिंग वर्षासाठी (ऑक्टोबर-सप्टेंबर) 60 लाख टन साखर निर्यातीसाठी 3600 कोटी रुपयांच्या सबसिडीचा प्रस्ताव तयार केला आहे.

गेल्या वर्षी मार्केटिंग ईयर 2019- 20 मध्ये केंद्र सरकारने 10,448 रुपये प्रति टन एकरकमी निर्यात सबसिडी दिली होती. त्यामुळे केंद्राच्या तिजोरीवर 6268 कोटी रुपयांचा आर्थिक ताण पडला होता. मात्र, यंदा चालू विपणन वर्षात गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी निर्यात सबसिडी देण्याचा प्रस्ताव सरकारने तयार केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!