सातारा : मराठावाडा आणि विदर्भात अतिवृष्टी झाली असून शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त झालं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे अतिवृष्टी भागाची पाहणी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मराठवाड्यात अजून गेले नसल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं. फडणवीसांच्या या वक्यव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार चोख उत्तर दिलं आहे.
अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली म्हणजे सर्वच कळते असं नाही, असा टोला अजित पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे. अजित पवार आज साताऱ्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांनी सातारा येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्याचा आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार टोला लगावल्याचं पाहायला मिळालं आहे.
मराठवाडा भागात अद्याप मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पहाणी करायला गेले नाहीत असं विरोधक म्हणत आहे. पण पाहणी केली म्हणजेच सर्व कळते असे नाही. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी गेले आहेत. आजही ते गेले आहेत. मंत्रालयात बसून व्हीसी घेऊन सर्वांशी संपर्क साधला जात आहे. शेतकऱ्यांना काय मदत पाहिजेत याचा आढावा घेतला जात आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
जयंत पाटील, शंकरराव गडाख, राजेश टोपे, अमित देशमुख, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे आणि वर्षा गायकवाड हे सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. आम्ही गेल्यावर प्रोटोकॉल प्रमाणे सर्व शासकिय यंत्रणा आमच्या मागे येते. त्यांचं अख्या दिवसाचं काम बुडते. त्यामुळे गैरसमज पसरवू नका, जेथे पाहणी केली पाहिजे तिथे केली पाहणी जात आहे, असं अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘गांधी हत्येनंतर मिठाई वाटणा-या लोकांना महात्मा गांधी यांच्याच नावाचा आसरा घ्यावा लागतो
- युपीला भेट देण्यासाठी आता व्हिसाची गरज आहे काय? ‘त्या’ घटनेवरून भूपेश बघेलांचा संतप्त सवाल
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- शाळेच्या पहिल्या दिवशी लगेच अभ्यास नको; वर्षा गायकवाड पोहचल्या शाळेत
- ‘आपले सरकार आले तरी मोदीसरकार विरोधातील लढाई अजून संपलेली नाही’


