🕒 1 min read
गंगापूर: प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा वाटपात गंगापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. प्रशासनाने सर्व नियम डावलून केवळ सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात पीक विमा मंजूर केला आहे. हा आमच्या मतदारसंघातील सामान्य जनतेवरील अन्याय आहे. अशी प्रतिक्रिया आमदार प्रशांत बंब यांनी औरंगाबाद येथे दिली.
आमदार बंब म्हणाले की, एकीकडे मतदार संघात अतिवृष्टी झाली म्हणून शासनाने गंगापुर तालुक्यातील ८० हजार शेतकऱ्यांना सुमारे ५० कोटी रुपये अतिवृष्टी अनुदान म्हणून एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मंजूर केले. तर दुसरीकडे ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास शासनाच्या नियमानुसार सरसकट पिक विमा मंजूर व्हायला पाहिजेत. मात्र तसे न होता गंगापूर मतदार संघातील पिक पिक विमा योजनेअंतर्गत कापूस पिकांसाठी बाजार सावंगी मंडळ वगळता एकाही मंडळाला खरीप हंगामाचा पिक विमा मंजूर झाला नाही.
पीक कापणी प्रयोग उंबरठा उत्पन्न अतिवृष्टीच्या नोंदीचा अभ्यास करून पीक विमा मंजूर केला जातो. मात्र प्रशासनाने सर्व नियम डावलून केवळ सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात पीक विमा मंजूर केला आहे. याविषयी चौकशी करून पीक कापणी प्रयोगाच्या नोंदी उंबरठा उत्पन्न कसे. अतिवृष्टीची नोंद याची दखल घेऊन शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणीही आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. असेही आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- तिन वर्षानंतरही संत एकनाथ रंग मंदिराचे काम ८० टक्के पूर्ण, साडे पाच कोटींसाठी मनपाचा पाठपुरावा
- पठ्ठ्याने यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब पण प्रयोग फसला, डिफ्युज करायला गाठले पोलीस स्टेशन
- पालक म्हणतात दहावी-बारावीचे परिक्षा शुल्क परत करा, मंडळ म्हणते खर्च जास्त देणे कठिण!
- घरी परतणाऱ्या पादचारी वयोवृद्ध हॉटेल कामगाराचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू
- …तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जातील; नाना पटोलेंच्या वक्तव्याने नवा वाद


