औरंगाबाद : मागील तीन वर्षांपासून दुरुस्तीच्या नावाने बंद असलेल्या संत एकनाथ रंग मंदिराचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, लवकरच संपूर्ण काम होऊन रंग मंदिर पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली. तसेच कामासाठी लागणाऱ्या उर्वरित साडे पाच कोटी रुपयांच्या निधीचा पाठ पुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील प्रचलित रंग मंदिर म्हणून संत एकनाथ रंग मंदिराची ओळख आहे. अनेक वर्षांपासून इथे विविध कार्यक्रम, नाटक होत होती. यात अनेक दिग्गज कलाकार देखील वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी तसेच प्रयोगांसाठी येऊन गेले. २०१६ साली नाटकाच्या प्रयोगादरम्यान रंग मंदिराच्या इमारतीत काही प्रमाणात पडझड झाली. त्यावेळी प्रशांत दामले यांनी रंग मंदिर नुतनिकरनचा सूर धरला. त्यानंतर कलाकार, रसिक यांनी आंदोलन छेडले.
तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी १ मे २०१८ रोजी नूतनीकरणासाठी संत एकनाथ रंग मंदिर बंद केले. त्यासाठी सुरुवातीला २ कोटी एवढा खर्च ठेवण्यात आला होता. परंतु तो खर्च कालांतराने वाढत जाऊन, साडे सात कोटीवर जाऊन पोहचला. त्यातील दोन कोटी रुपये शासनाने दिले. मात्र, साडे पाच कोटींचा पाठपुरावा मनपा करत असल्याची माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- …अन्यथा निर्बंध पुन्हा नव्याने लावावे लागतील ; वडेट्टीवारांचा इशारा
- शिवसेनेची विचारधाराच चंचल झालीये; दरेकरांची टीका
- स्वबळावर निवडणुका लढवण्याची भूमिका योग्यच, काँग्रेसच्या बड्या नेत्याचे पटोलेंना समर्थन !
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

