🕒 1 min read
नागपूर : नागपूर शहरात काही दिवसांपूर्वी यूट्यूब पाहून एका मुलाच्या हत्येचा कट आखल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच आता एका युवकाने यूट्यूबवर पाहून बॉम्ब तयार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे नागपूर शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल युवराज पगाडेने यूट्यूबवर बॉम्ब तयार करण्याचा व्हिडियो बघून एक गावठी बॉम्ब तयार केला.
परंतु बॉम्ब तयार करण्याच्या नादात काहीतरी अर्धवट तयार केले. मात्र, हे स्फोटक निकामी होत नसल्याने या तरुणाने अखेर थेट पोलीस ठाण्यातच धाव घेतली. नागपुरातील नंदनवन पोलीस स्थानकात हा तरुण स्फोटक पदार्थ असलेली बॅग घेऊन आला. सुरुवातीला त्याने आपल्याला ही बॅग रस्त्यात सापडल्याची बतावणी केली. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्याचा बनाव उघड झाला. त्यानंतर पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला बोलावून बॅगमधील स्फोटकसदृश वस्तूची तपासणी केली.
आरोपी राहुलने पोलिसांना बॉम्बची माहिती देताच बॉम्ब शोधक व नाशक पथकाला बोलावण्यात आले. पथक आल्यानंतर त्यांनी या गावठी बॉम्बचे इलेक्ट्रिक सर्किट वेगळे करुन बॉम्ब निकामी केला. दरम्यान, पोलिसांनी संबंधित प्रकरणात आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 285, 286 , 7, 25(1) (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पालक म्हणतात दहावी-बारावीचे परिक्षा शुल्क परत करा, मंडळ म्हणते खर्च जास्त देणे कठिण!
- …तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांच्या अंगावर जातील; नाना पटोलेंच्या वक्तव्याने नवा वाद
- ‘आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही’ ; कपिल सिब्बल यांचा दावा
- अज्ञात वाहनाच्या धडकेत फुगे विक्रेत्या बाप-लेकीचा मृत्यू, तर मामा गंभीर जखमी
- पुण्यात उद्यापासून आणखी नियम शिथिल होणार; जाणून घ्या आज किती सक्रिय रुग्ण ?


