जळगाव : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार हे निश्चित आहे. ममतांना पराभूत करण्यासाठी या निवडणुकीत भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा आणि दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते. हे आव्हान स्विकारत ममता बॅनर्जी भाजपसमोर ठामपणे उभ्या राहिल्या होत्या. ‘भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली पण पदरी निराशाच आली आहे. बंगालच्या जनतेनं ममतादीदींना साथ देऊन भाजपला दूर सारले’, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा दुपारपर्यंत निकाल हाती आला तेव्हा दोनशे पेक्षा अधिक जागांवर तृणमूल काँग्रेसने आघाडी घेतली आहे. ममता पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे निश्चिक आहे. ममतांच्या विजयावर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. ‘पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एक वेळ तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास व्यक्त केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून जनतेने दूर ठेवले आहे’, अस म्हणत एकनाथ खडसे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
खडसे म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला दोन तृतीयांश मतदानाकडे सध्या वाटचाल सुरू आहे. अशा स्वरूपाचे आज दिसत आहे. पश्चिम बंगालची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह देशभरातील प्रमुख पदाधिकारी त्याठिकाणी प्रचारासाठी होते. या ना त्या प्रकारे पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन करावी यासाठी भाजप मैदानात उतरली होती, असा टोला खडसे यांनी भाजपला लगावला. दरम्या, जळगावमधील जामनेरचे आमदार तथा भाजप नेते गिरीश महाजन हे देखील बंगालमध्ये प्रचारासाठी गेले होते.
महत्त्वाच्या बातम्या
- पुरोगामी महाराष्ट्र हादरला! पतीला घटस्फोट देणाऱ्या महिलेला जातपंचायतीकडून थुंकी चाटण्याची शिक्षा
- रेमडेसिवीर प्रकरण; खा.सुजय विखेंच्या अडचणीत वाढ, ‘या’ अधिकाऱ्याकडे दिला तपास
- ‘..तर अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, उत्तर कोरियाचा इशारा
- बायकोला भेटण्यासाठी चोर कोविड सेंटरमधून पळाला, पण बायकोनेच त्याला पकडून दिले
- काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरिबांच्या लसीकरणाचा खर्च करावा, नाना पटोले यांचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

