Share

औरंगाबाद पालिकेचा उपक्रम, लाभार्थ्यांची यादी द्या, अन लसीकरण करून घ्या!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी महापालिकेने मोबाईल टिम तयार केली आहे. सोसायटी अथवा संस्थेने २०० लाभार्थ्यांची यादी दिल्यास त्या ठिकाणी जाऊन मोबाईल टीम लसीकरण करणार आहे. असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी सांगितले.

शहरात ११५ वॉर्डात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र लसींच्या उपलब्धते अभावी लसीकरण मोहीम बारगळली होती. आता पुन्हा नव्याने राज्य शासनाने आदेश काढत २२ जून पासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू केले आहे. पुन्हा एकदा जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. शहरात आत्तापर्यंत ३ लाख ७९ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दररोज १३ ते १४ हजार जणांचे लसीकरण केले जात असून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण जलदगतीने करण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत.

आता लसीकरणासाठी मोबाईल टीम तयार करण्यात आल्या आहेत. सोसायटी किंवा संस्थेच्या २०० लाभार्थ्यांची यादी सादर केल्यास तातडीने त्याच भागात शिबिर घेऊन लसीकरण करण्यात येईल. यासाठी परिसरात स्वतंत्र खोली किंवा बसण्यासाठी मोकळी जागा देण्यासाठी स्वतंत्र वेटिंग रूम अशी व्यवस्था असावी असे पाडळकर यांनी सांगितले.

प्रोझोन मॉलच्या पार्किंग मध्ये कार मधून किंवा तीन चाकी वाहनातून घेणाऱ्यांना लस देण्याची सुविधा आहे. या ठिकाणी १२ ते ८ या वेळेत लस दिली जात आहे. त्यासोबतच आता पायी येणाऱ्या नागरिकांना लस देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!