Share

…अन् अचानक ‘गब्बर’ने सुरु केला भांगडा ; पहा भन्नाट व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय संघ इंग्लंडमध्येच असणार आहे. इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुंचा दुसरा संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हे शिखर धवन करणार आहे.

या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे खेळाडू मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. निर्धारीत कार्यक्रमानुसार १४ जुनपासुन श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ मुंबईत दाखल होत आहेत. श्रीलंका दौऱ्यातील भारतीय संघाचा कर्णधार शिखर धवनने मुंबईत पोहचल्यानंतर इंन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओत शिखर धवन वर्कआउट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर चालू असलेल्या एका ट्रेंडचा आहे. हा ट्रेंड फॉलो करत वर्कआउट करताना तो अचानकपणे भांगडा करताना दिसत आहे. शिखर धवनचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडिओवर कॉमेंट्सचा वर्षाव होत आहे.

https://www.instagram.com/reel/CQfe12virzj/?utm_source=ig_web_copy_link

विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर ३० जुन रोजी भारतीय संघ श्रीलंकेला रवाना होईल. तिथे त्यांना काही दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर सराव करण्यास परवानगी मिळेल. श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाला ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहे. भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू हे इंग्लंडच्या दौऱ्यावर असल्याने या दौऱ्यात युवा आणि खराब कामगीरीमुळे संघातील स्थान गमावलेले खेळाडू या दौऱ्यावर जातील. या दौऱ्यातील काही खेळाडूंना आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत संधी मिळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!