औरंगाबाद : पैठण तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानात जुन महिण्याचे मोफतचे तांदुळ आलेले आसुन ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने एक प्रकारे मोफतचे धान्य देऊन शासनाने गरीबांची एक प्रकारे फसवणूकच केली आहे. याविरोधात नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहे.
गतवेळी शासनाने स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट दर्जाची मका गरीबांच्या माथी मारली होती, त्यावेळी मका रुपया दोन रुपये किलो प्रमाणे म्हशींना चारा म्हणुन विकण्यात आला होता, जो तांदुळ स्वस्त धान्य दुकानात आलेला आहे, तो देखील निकृष्ट दर्जाचा आहे. अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहे. नागरीकांच्या तक्रारीवरुन शहरातील स्वस्त धान्य दुकानांचा आढावा घेतला असता दुकानात मोफत वाटपासाठी ठेवण्यात आलेल्या तांदळात जाळेच जाळे आढळुन आले आहे, या बाबत दुकानदाराशी चर्चा केली असता सर्व दुकानांमध्ये असाच जुना आणी जाळे असलेला तांदुळच आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी परत दोन तीन दुकानांना भेट दिली असता त्या ठिकाणी देखील असाच तांदुळ आढळुन आला, या बाबत पुरवठा आधिकारी यांच्या संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही, तर मोफत रेशनच्या नावे शासनाने एक प्रकारे गोरगरीबांची थट्टा केल्या सारखेच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- #HBD : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री ‘सई ताम्हणकरला’ वाढदिवसाच्या शुभेच्छा…
- कर्णधार कोहलीचा ‘बेस्ट ऑफ थ्री’ला पाठिंबा, म्हणाला…
- मराठवाड्याला अतिरीक्त पाणी देण्याचे सरकारचे नियोजन- जयंत पाटील
- खासगी कोचिंग क्सासेससाठी आमदार अंबादास दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिष्टाई
- ‘मोठी गोष्ट सहज मिळत नाही’ ; पराभवानंतर शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

