Share

तृतीयपंथीयांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात

Published On: 

उस्मानाबाद : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या आणि जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने तृतीयपंथीयांचे कल्याण हा विषय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे सोपविला आहे. त्यानुसार राज्यात तृतीयपंथीयांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे.

या समितीच्या ६ जुलै २०२१ रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुणे येथील समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या निर्देशानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तिंना प्राधान्याने कोविड-१९ लस देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाकडून तृतीयपंथीयांना प्राधान्याने कोविड-१९ लस देण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.

गरोदर मातांनी लस घेऊन स्वत:ला सुरक्षित करावे
कोरोनाचा संसर्ग हा दुर्धर आजारी व्यक्ती, वयोवृद्ध व गरोदर मातांना अधिक होऊ शकतो. त्यामुळे गरोदर मातांनी कोरोना लस घेण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार जिल्ह्यातमातृत्व संवर्धन दिन अभियानानिमित्त फक्त गरोदर मातांच्या लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. गरोदर मातांसाठी कोरोना लस सुरक्षित आहे. त्यांनी लस घेऊन स्वत:ला संरक्षित करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

जिल्ह्यात गुरुवारी ५८ ठिकाणी केवळ गरोदर मातांसाठी आयोजित लसीकरणात ५२१ मातांचे लसीकरण करण्यात आले. तथापि ९ जुलै रोजी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानदिनी ७०० गरोदर मातांचे लसीकरण झाले. कोविड लसीमुळे कोविड गंभीर स्वरुपाचा होत नाही, कमी दिवसाची प्रसुती, नवजात बालकांचा मुत्यू होणे, प्रसुतीच्या वेळी गुंतागुंत होणे या बाबी सहजपणे टळू शकतात. त्यामुळे लस घेणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!