Share

पुण्यातील महाविद्यालयात लसीकरणाला सुरुवात

Published On: 

🕒 1 min read

पुणे : कोरोना महामारीमुळे गेली दीड वर्ष सर्व शाळा, महाविद्यालय बंद होती. परंतु गेल्या काही दिवसापूर्वी पुणे तसेच संपूर्ण राज्यातील शाळा, महाविद्यालय जोमाने सुरु करण्यात आली आहेत आणि त्याला विद्यार्थी तसेच पालकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. यामुळे अनेक विद्यार्थी पुन्हा त्यांनी शिक्षणाची वाट धरतांना दिसत आहेत.

कोरोना लसीकरणाचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्याचा विचार करून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाविद्यालयात लसीकरणाला सुरुवात करून मॉडर्न महाविद्यालयाच्या लसीकरण केंद्रात या मोहिमेचा प्रारंभ केला. त्यांनी त्या संदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे ‘महाविद्यालयात लसीकरणाला सुरुवात ! लसीकरण मोहिमेला आणखी व्यापक करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल म्हणून आपण थेट महाविद्यालयात लसीकरणाला सुरुवात केली आहे. आज पहिल्या दिवशी शहरातील ६ महाविद्यालयांत केंद्र सुरु केले आहेत’ तसेच लवकरच ही मोहीम सर्व महाविद्यालयात सुरु करण्यात येईल असे मोहोळ म्हणाले.

दरम्यान ज्या कोणत्या विद्यार्थाचे लसीकरण अजून बाकी होते त्यांना या कार्यक्रमामुळे नक्कीच फायदा होईल. महाराष्ट्राचा विचार केला तर कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या 9 कोटी 52 लाखांहून अधिक मात्रा देऊन झाल्या आहेत. यामध्ये 6 कोटी 55 लाखांहून अधिक लसींची पहिली मात्रा तर 2 कोटी 96 लाखांहून लसींची दुसरी मात्रा देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!