🕒 1 min read
मुंबई : आज सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची जयंती. यानिमित्ताने सर्व स्तराहून सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सावित्रीबाई फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेली कविता शेअर करत सावित्रीबाईंना अभिवादन केले आहे.
यशोमती ठाकूर ट्विट करत म्हणाल्या, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे फुले दाम्पत्याचं दैवतच. सावित्रीबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेली ही कविता.’

सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्यामुळे भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून त्यांची ओळख झाली. यासह विविध अनिष्ट रुढी परंपरांबाबत त्यांनी जनजागृतीही केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे फुले दाम्पत्याचं दैवतच. सावित्रीबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेली ही कविता. #SavitribaiPhule #सावित्रीउत्सव pic.twitter.com/n9tznMvGp6
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) January 3, 2022
सावित्रीबाई फुले या समाजसेविका आणि शिक्षिका होत्या. ज्यांनी शिक्षण मिळवून केवळ समाजातील वाईट प्रवृत्तींचाच पराभव केला नाही, तर जेव्हा समाजात अनेक प्रकारचे लिंगभेद होते अशा वेळी भारतातील मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे महान काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई-गोवा क्रूझवर कोरोनाची एंट्री; २००० हून अधिक प्रवासी अडकले
- “डी कॉकच्या निवृत्तीचा कोणताही परिणाम होणार नाही”, डीन एल्गरचा भारताला इशारा
- भाजप खासदाराचे जे.पी नड्डा यांना पत्र, स्वत: भगवान कृष्णाने प्रेरित केल्याचे सांगत केली ‘ही’ मागणी
- काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष; मग औरंगाबादच्या अध्यक्षपदी ओबीसी समाजातील महिला का चालत नाही?-उज्वला दत्त
- मुंबई-गोवा क्रूझवर कोरोनाची एंट्री; २००० हून अधिक प्रवासी अडकले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
