Share

जालना ते खामगाव या रेल्वेमार्गास राज्य सरकारने पन्नास टक्के खर्च करावा- रावसाहेब दानवे

Published On: 

🕒 1 min read

जालना: जालना ते खामगाव या प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने जमीन देऊन पन्नास टक्के खर्च करावा. अशी मागणी
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘अटलजी ते मोदी सुशासनाचा प्रवास’ या विषयावर जालना येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही मागणी केली.

जालना ते खामगाव या रेल्वेमार्गासाठी वेळ पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटायला तयार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान यावेळी गवान महाराज आनंदगडकर यांना अमेरिकन विद्यापीठाच्या वतीने ‘डिलीट’ पदवी देण्यात आली. या प्रसंगी दानवे यांच्याहस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी रावसाहेब दानवे यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. अटलबिहारी वाजपेयी यांनी रचलेल्या सर्व स्वप्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वास्तवात आणत आहेत. अतिशय शांतपणे आणि संयमाने देशाच्या राज्य कारभारातून सकारात्मक परिवर्तन होत असल्याचे म्हणत त्यांनी मोदींचे कौतुकही केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!