🕒 1 min read
अहमदाबाद : भारताने कसोटी मालिका ३-१ ने आपल्या खिशात घातली होती. आता, भारत आणि इंग्लंड मध्ये टी-२० मालिकेला सुरुवात झाली आहे. आज पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या टी 20 मालिकेतील सर्व म्हणजेच 5 सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममध्ये फक्त 50 टक्के क्रिकेट चाहत्यांनाच परवानगी दिली आहे.
दरम्यान, भारताची सुरुवात ही अडखळत झाल्याचं दिसून येत आहे. सलामीवीर के एल राहुल अवघी एक धाव करून माघारी परतला आहे. जोफ्रा आर्चर च्या गोलंदाजीवेळी इन्साईड एज लागून बॉल स्टम्पवर आदळल्याने के एल राहुल बाद झाला. तर, यानंतर लगेचच कर्णधार विराट कोहली शून्यावरच माघारी परतला आहे. आदिल रशीदच्या गोलंदाजीवर विराट झेलबाद झाला आहे.
इंग्लंडचा संघ –
इयन मॉर्गन (कॅप्टन), जेसन रॉय, जोस बटलर, डेव्हीड मलान, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद आणि मार्क वुड.
भारताचा संघ –
विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत(यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि युझवेंद्र चहल.
महत्त्वाच्या बातम्या
- वाईफसाठी परेशान जाधव म्हणतात ‘अ ब्युटीफुल लाईफ !’
- वडोदबाजार येथील आठवडी बाजार बंद
- परभणीत नागरी भागामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत संचारबंदी
- एसटी महामंडळाच्या बसेस आता गंगापूरलाही थांबणार
- महत्त्वाच्या कामांसाठी शेतकऱ्यांचे पशुवैद्यकीय दवाखान्यात हेलपाटे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
