औरंगाबाद :सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सर्वनञ (लिक्वीड नायट्रोजन) चा मागील महिन्यातील एकोनावीस फेब्रुवारीपासून तुटवडा आहे. तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून पुरवठा होत नसल्याने गायीचे कृत्रिम रेतन करण्यासाठी शेतक-यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
गायीचे कृञीम रेतन वेळेवर करण्यासाठी शेतक-यांना अधिकचे पैसे देऊन लिक्वीड नायट्रोजन (सर्वनञ)खाजगी मेडीकलमधुन विकत घ्यावे लागत आहे व त्याचा भुर्दड शेतक-यांना हकनाक भरावा लागत आहे. यावेळी भराडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी एम बी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मागील महिन्यातील एकोणावीस फेब्रुवारी पासुन ते आजपर्यंत वरिष्ठ कार्यालयातून लिक्वीड नायट्रोजनचा पुरवठा झालेला नाही लवकरच पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भराडी हे मोठे बाजारपेठेचे गाव असुन येथील पशुवैद्यकीय दवाखान्याशी पंचक्रोशीतील ब-याचशा गावातील शेतक-यांचा संपर्क येतो. तरी संबंधीत विभागाने शेतक-यांची अडचण लक्षात घेऊन लवकरात लवकर लिक्वीड नायट्रोजनचे भराडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वितरण करावे अशी मागणी शेतक-याकडुन होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आ.मेटे यांनी स्वस्त धान्य दुकानाचा विषय मांडला सभागृहात
- ‘चंद्रकांतदादा तुम्ही सरकारविरोधात अविश्वास ठराव आणून दाखवाच, मग तुम्हाला समजेल…’
- बापरे… भारतातील सक्रीय रुग्णांपैकी 71.69% रुग्ण महाराष्ट्र आणि केरळ मध्ये
- स्वराज्याला ७५ वर्ष झाली. सुराज्य आलं का?; मुख्यमंत्र्यांचा सवाल
- औरंगाबादेतील काही भाग पुन्हा होणार कंटेनमेंट झोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

