औरंगाबाद : औद्योगिक कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेला पायभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. असे मत व्यक्त करीत रासी सिड्सच्या वतीने अन्वी गावात बसविण्यात आलेला वॉटर फिल्टर प्लान्टचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
रासी सिड्सच्या वतीने सीएसआर फंडातून सिल्लोड तालुक्यातील अन्वी येथे वॉटर फिल्टर प्लान्ट बसविण्यात आला आहे. रविवारी ( दि. २१) या प्लांटचे लोकार्पण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. रासी सिड्स कंपनीच्या माध्यमातून अन्वी गावामध्ये व परिसरातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे या हेतूने कंपनीच्या वतीने CSR फंडातून १० लाख रुपये किंमतीचे वॉटर फिल्टर ग्रामपंचायतीला भेट देण्यात आले.
त्यामध्ये नागरिकांना १ रुपयात १ लिटर तर ५ रुपयांत २० लिटर शुद्ध पाणी मिळणार आहे. यामुळे अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या आजारापासून या परिसरातील नागरीकांना काही प्रमाणात मुक्ती मिळणार असल्याचे रासी सिड्स कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, नायब तहसीलदार कमल मनोरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- काही जण माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा उचलतात हे आता लक्षात आलंय-नारायण राणे
- ‘ “त्या” वेळीही उद्धव ठाकरेंनी राणेंविरोधात षडयंत्र केलं होतं; आताही त्यांच्या पोटात दुखतंय’
- बापाबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या ‘राणे’ला शिक्षा झालीच पाहिजे – आ. रमेश बोरनारे
- ‘नारायण राणेंचं एन्काऊंटर करणार’, शिवसेना नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- कल्याणसिंह : राम मंदिरासाठी सत्तेचा त्याग करणारे उत्तम शासक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

