बाली : भारताचे बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय यांनी विजयी सुरुवातासह इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत विजयी प्रारंभ केला. परंतु बी. साईप्रणीत आणि पारुपल्ली कश्यप यांचे आव्हान संपुष्टात आले.
श्रीकांतने जागतिक क्रमवारीत ७१व्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सच्या ख्रिस्टो पोपोव्हचा एक तास, १५ चाललेल्या सामन्यात २१-१८,१५-२१, २१-१६ असा पराभव केला. तर प्रणॉयने मलेशियाच्या लीव डॅरेनला २२-२०, २१-१९ असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत १६व्या क्रमांकावर असलेल्या साईप्रणीतने इंडोनेशियाच्या शेसार रुस्टाव्हिटोविरुद्ध २१-१६, १४-२१, २०-२२ अशी हार पत्करली.
मात्र दुसरीकडे माजी राष्ट्रकुल विजेत्या कश्यपला डेन्मार्कच्या हॅन्स-क्रिस्टियन सोलबर्ग व्हिटिंगहसकडून १०-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि एन. सिक्की रेड्डी जोडीने जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या प्रवीण जॉर्डन आणि मेलाटी ओक्टाव्हियांटीवर २१-११, २२-२० असा विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या
- देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल- शरद पवार
- गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करा- राहुल गांधी
- ‘एखाद्या नाचीनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं’
- मलाना क्रीम घेऊन बोलल्याने बापूंचे विचार संपणार नाहीत- नवाब मलिक
- राज्याने कर कपात करून जनतेला दिलासा द्यावा; नाना पटोलेंचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

