मुंबई : महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या १०० कोटींच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. दरम्यान, यासंदर्भात पवारांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
पवार हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले की,’राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लहान-थोर कार्यकर्ता त्याचा विचार कधीच सोडणार नाही आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा व्याजासकट या लोकांना अक्कल शिकवल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. राज्य चालवायचे असते ते दिलदारपणे. सत्तेचा वापर करायचा सन्मानाने. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे. मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहात नाहीत व सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून सत्त गेल्यावर असं घडतं.’
देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. राज्य चालवायचे असते ते दिलदारपणे. सत्तेचा वापर करायचा सन्मानाने. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे. मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहात नाहीत व सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून सत्त गेल्यावर असं घडतं. pic.twitter.com/1mm6ttvjVl
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 17, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’राज्यातील सरकार आपल्या हातून गेलं म्हणून काही करता येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे त्रास देणे, अटक करणे, बदनामी करणे हे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. तुम्ही कितीही छापे मारा आज ना उद्या ही सगळी शक्ती सामान्य माणसांचा पाठिंबा घेऊन कधीही तुम्हाला राज्यात सत्तेत येऊ देणार नाही.’ तसेच होताच अनिल देशमुख माझ्याकडे आले आणि दोष लागल्यामुळे मी सत्तेत बसणार नाही हा निर्णय घेतला व त्यांनी राजीनामा दिला. हे कशामुळे घडले तर एका माजी आयुक्तांमुळे घडले. आता हे आयुक्त आहेत कुठे? तुम्हाला तोंड दाखवायची ज्यांची तयारी नाही असे अधिकारी बाहेर आहेत आणि अनिल देशमूख आत आहेत,असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरारी गुन्हेगार घोषित
- विदर्भातल्या मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवायला हव्या होत्या; शरद पवारांचा फडणवीसांना टोला
- ‘एखाद्या नाचीनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं’
- मलाना क्रीम घेऊन बोलल्याने बापूंचे विचार संपणार नाहीत- नवाब मलिक
- राज्याने कर कपात करून जनतेला दिलासा द्यावा; नाना पटोलेंचा सल्ला


