Share

गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करा- राहुल गांधी

Published On: 

मुंबई : बुधवारी(१७ नोव्हें.)काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल विमान खरेदी व्यवहारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, त्यांच्या याचिकेवर २२ नोव्हें.ला सुनावणी होणार आहे.

याचिकेमध्ये स्थानिक न्यायालयाकडून बजावण्यात आलेले समन्स १२ जुलै २०२१ ला मिळेपर्यंत आपल्याला या तक्ररीविषयी काहीच माहीत नसल्याचा दावा राहुल यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीमल यांनी २०१९ मध्ये राहुल यांच्याविरोधात गिरगाव न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत गिरगाव न्यायालयाने राहुल यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. गिरगाव न्यायालयाने केलेली ही कारवाई रद्द करण्याच्या मागणीसाठी राहुल यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तसेच याचिकेवर निर्णय देईपर्यंत गिरगाव न्यायालयाने सुरू केलेल्या कायदेशीर प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. मानहानी प्रकरणी कारवाईची मागणी केवळ बदनामी झालेली व्यक्तीच करू शकते, असेही ते याचिकेत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!