औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोनाचाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. औरंगाबादेतील रुग्णांचा आकडा रविवारी १०२३ वर गेला असल्याने चिंता वाढली आहे. मागील काही महिन्यातील हा सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्येचा आकडा आहे. त्यामुळे औरंगाबाद करांनी आता सावधान होण्याची गरज आहे. असेच संकेत आज वाढलेल्या आकड्यावरून दिसून येत आहे. संख्या नियंत्रणात आली नाही तर पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना औरंगाबादकरांना करावा लागू शकतो असे संकेत प्रशासनाने दिले आहे.
जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाने अंशतः लॉकडाऊन लावत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे. यामध्ये स्वतः जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदीसह सर्व यंत्रणा रस्त्यावर उतरून कोरोना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहे. नागरिकांनी देखील नियमांचे पालन करून कोरोना रोखण्यास मदत करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
गुरुवारी सर्वाधिक म्हणजे ९०२ इतकी रुग्णसंख्या जिल्ह्यात आढळून आली होती. परंतु रविवारी मागील काही महिन्याचे रेकॉर्ड तोडत मनपा (793) आणि ग्रामीण (230) म्हणजे १०२३ इतकी रुग्णसंख्या आढळून आली. तर दिवसभरात पाच व्यक्तींचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद करांनी आता सावध होत नियमांचे पालन करणे अनिवार्य झाले आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- परभणी जिल्ह्यात रविवारी 87 व्यक्ती कोरोनाबाधित, एका रुग्णाचा मृत्यू
- भाजपचा मास्टर प्लान,केंद्रीय मंत्र्यासह चार खासदारांना भाजपने दिले विधानसभेचे तिकीट
- ममता बॅनर्जींसोबत घडलेली घटना ही घातपात नसून अपघात : निवडणूक आयोग
विजय हजारे ट्रॉफीत पृथ्वी शॉने रचला इतिहास
- सुर्यकुमार यादव आणि इशान किशनच्या समावेशानंतर मायकल वॉनचे हे टिवट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

