Share

टॉलीवूड कलाकारांची भाजपमध्ये चलती, विधानसभा निवडणुकीत दिली उमेदवारी

Published On: 

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिग्गज चेहरे उतरवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये पक्षातील खासदारांचाही समावेश आहे. राजकारणातील दिग्गज हस्तींसोबतच बंगाली चित्रपट उद्योग म्हणजेच टॉलीवूडच्या कलाकारांनाही भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

यामध्ये अभिनेता यशदास गुप्ताला हुगलीच्या चंडीतला मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अभिनेत्री पायल सरकारला कोलकाताच्या बेहाला (ई) मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. भाजपमधील कलाकारांची यादी एवढ्यावरच संपत नाही तर, तनुश्री चक्रवर्तीलाही हावडा जिल्ह्यातील श्यामपूर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्याच बरोबर प्रसिद्ध अभिनेत्री अंजना बसूला परगना जिल्ह्यातील सोनारपूर (सा) मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू झाल्यापासूनच भारतीय जनता पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात अनेक कलाकारांचाही समावेश आहे. यातील काही कलाकारांना भाजपच्या वतीने निवडणुकीत संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांच्या यादीत या कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!