Share

भारतीय क्रिकेट संघातील दोन खेळाडूंची कारकीर्द धोक्यात??

Published On: 

🕒 1 min read

भारतीय कसोटी क्रिकेट संघाने २०२०-२०२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला होता. अजिंक्य राहणे याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियामध्ये २ कसोटी सामने जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. त्याच अजिंक्य राहणेची कारकीर्द आता धोक्यात आली आहे. तसेच सध्याच्या भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा द वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजारा याची देखील कसोटी कारकीर्द धोक्यात आली आहे. अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजारा यांची कसोटी कारकीर्दच धोक्यात आल्याचे सूचक विधान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केले आहे.

अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे भारताचे दोन प्रमुख कसोटी फलंदाज आहेत, परंतु मागील काही कालावधीपासून त्यांचा फॉर्म हा संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्यांना शेवटची संधी दिली गेली होती अन् त्यातही ते फार काही चांगली कामगिरी करू शकले नाही. त्यामुळे आता या दोघांचं पुढे काय?, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.अशातच  बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या दोघांच्या बाबतीत एक सूचक इशारा दिला आहे.

स्टारस्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीनं पुजारा व रहाणे यांच्या फॉर्माबाबत मत व्यक्त केले. या दोघांनी आता रणजी करंडक स्पर्धेत खेळून धावा करायला हव्यात, असे मत गांगुलीने या वेळी व्यक्त केले. २००५ मध्ये गांगुलीनेही रणजी करंडक स्पर्धेत खेळाडू फॉर्म मिळवला होता.तरी भारतातील समस्त क्रिकेट प्रेमींना पुन्हा अजिंक्य राहणे आणि चेतेश्वर पुजाराचा हरवलेला फॉर्म परत मिळावा अशी आशा लागून राहिली आहे.

       महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!