Share

चायनाच्या कमांडरमुळे भारताचा बीजिंग ऑलिंपिकवर बहिष्कार टाकायचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : चीन आणि भारतामध्ये झालेल्या २०२० च्या सीमा चकमकींमध्ये सामील असलेला कमांडर बीजिंग ऑलिम्पिक मशाल रिलेमध्ये दिसल्यानंतर भारताने बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकवर राजनैतिक बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की चीनने ऑलिंपिकचे राजकारण करणे निराशाजनक आहे आणि बीजिंगमधील हिवाळी ऑलिंपिकच्या उद्घाटन किंवा समारोप समारंभाला भारतीय दूत उपस्थित राहणार नाहीत.

बहिष्कार टाकण्याच्या निर्णयानंतर प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर वेमपती यांनी दूरदर्शन स्पोर्ट्स चॅनलवर बीजिंग ऑलिम्पिकच्या उद्घाटन आणि समारोप समारंभांचे थेट प्रक्षेपण होणार नसल्याची माहिती दिली आहे. क्यूई फाबाओ हे २०२० मध्ये गलवान व्हॅली येथे झालेल्या चकमकीत चीनचे कमांडर होते. पीपल्स लिबरेशन आर्मी कमांडर क्यूई फाबाओ यांनी ऑलिंपिक मशाल रिले मध्ये सहभाग घेतला होता. ज्यात १२०० लोकांमध्ये त्यांनाही सन्मानित केले गेले होते. त्यामुळे भारताने हा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि कॅनडा ही राष्ट्रे अमेरिकेच्या नेतृत्वाखाली केल्या गेलेल्या राजनैतिक बहिष्कारात सामील झालेल्या राष्ट्रांपैकी आहेत. चीनने मानवाधिकाराचा उल्लंघन केल्याप्रकरणी या राष्ट्रांनी राजनैतिक बहिष्काराचा निर्णय घेतला होता. राजनैतिक बहिष्काराचा अर्थ असा आहे की सरकार स्पर्धेत शिष्टमंडळे पाठवणार नाहीत, परंतु खेळाडू क्रीडा स्पर्धेत भाग घेणार आहेत . कोविड-१९ मुळे आधीच इतर राष्ट्रांनी उद्घाटन कार्यक्रमांना येण्याचे आमंत्रण नाकारले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!