🕒 1 min read
सातारा: राजकीय नेत्यांसंबंधी वादग्रस्त वक्तव्य करणारे ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची सर्वत्र मोठ्या प्रमाणात टीका केली जात होती. त्यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात राष्ट्रवादीकडून राज्यभरात आंदोलन केले जात होते. शिवाय गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात जाऊन खटला दाखल करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिला होता. त्यामुळे सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर साताऱ्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर त्यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करत त्यांनी सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी वादग्रस्त विधाने केले होते. ते म्हणाले होते, ‘सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात. आणि मी हे सिद्ध करू शकतो. माझं चालेंज आहे की सुप्रिया सुळेनीं मला खोट सिद्ध करून दाखवावं. त्या दारू पितात हे सिद्ध करण्यासाठी मला कोणत्या पुराव्यांची गरज नाही. त्याचे फोटो ढिगाने पडले आहेत. राजकारणात यायच्या अगोदर त्या रस्त्यावर दारू पिऊन पडलेल्या दिसायच्या.’
या विधानानंतर त्यांच्यावर सर्वत्र टीका केली होती. या प्रकरणाची महिला आयोगानेही दखल घेतली आहे. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Chairperson of Women Commission Rupali Chakankar) यांनी बंडातात्या कराडकर यांचे वक्तव्य महिलांच्या आत्मसन्मानाला, स्वाभिमानाला धक्का देणारे असून अतिशय संतापजनक वक्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गळ्यात माळ आणि कपाळावर टीळा लावून असे आक्षेपार्ह वक्तव्य अतिशय धक्कादायक असून त्यांनी वारकरी संप्रदायाचाही अपमान केला असल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:

