🕒 1 min read
मुंबई : ‘सैराट’ (sairat) फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) सोशल मीडियावर सक्रिय असते. तसेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असते. मात्र सध्या तिच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यात नुकतचं तिनं रिल व्हिडिओ शेअर केलं असून प्रचंड व्हायरल झालं आहे.
रिकूने नुकतच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत ती निळ्या रंगाची साडी नेसलेली आहे. हलकासा मेकअप करून केसात गजरा ही लावलेला आहे. या व्हिडीओला १९६७ मधील लोकप्रिय ‘किस्मत’ चित्रपटातील ‘कजरा महोब्बतवाला ऑंखीयों में … ‘ या गाण्यावर केलेल्या हावभावामुळे चाहत्यांचे लक्ष वेधत आहे. या व्हिडीओवर तिनं ‘जुनी गाणी माझं प्रेम आहेत’ (Old songs are just my mood and heart) असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा व्हिडीओवर चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून या व्हिडीओची प्रचंड चर्चा रंगत आहे.
रिंकू राजगुरुचं 'कजरा महोब्बतवाला … खास Reel झाले व्हायरल pic.twitter.com/XnDoxds3Wz
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) February 4, 2022
गेल्या काही दिवसांपासून आर्ची म्हणजेच रिंकू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे. रिंकू एका प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. अलिकडेच रिंकूने सैराटफेम अभिनेता आकाश ठोसरसोबत (Akash Thosar) फोटो शेअर केला होता. यात ते दोघं डिनर डेटला गेले होते. सोशल मीडियावरील हे फोटो पाहिल्यावर ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. आता रिंकूने एक रिल शेअर केल्यामुळे तिची पुन्हा नव्याने चर्चा रंगत आहे.त्यातच तिने एक रिल शेअर केल्यामुळे नव्याने चर्चा रंगली आहे. तसेच सोशल मीडियावरील या व्हिडीओस लाखोंनी लाईक्स, कमेंट करत चाहत्यांनी पसंती दर्शवित आहेत.
महत्वाच्या बातम्या:
“वाईन दुकानांना महाराष्ट्रातच विरोध का?”, विरोधकांना नाथाभाऊंचा सवाल
“ह्याचे डोकं फिरले आहे…”, चंद्रशेखर राव यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचा संताप
भारतासाठी ‘जुमला’ चीनसाठी ‘नोकरी’; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर यूपीत झालेल्या गोळीबाराचा व्हिडीओ आला समोर; नेमकं काय घडलं जाणून घ्या
दोन हजार रुपयांत खोटे व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेट देणाऱ्याच्या ठाणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

