Share

महाराष्ट्राने काढला पहिला नंबर ; आतापर्यंत ‘इतक्या’ कोटी लोकांचे झाले लसीकरण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात लस ही महत्त्वाची अस्त्र झाली आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. देशात 18-44 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाला सुरुवात होणार झाली आहे. आणि या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील मिळत आहे.

महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबवली जात आहे. लसीकरण मोहिमेत महाराष्ट्रानं देशात विक्रमी घोडदौड कायम राखली आहे. राज्यात 3 कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्रानं देशातील अव्वल स्थान कायम राखलं आहे. देशात तीन कोटी लसीकरणाचा टप्पा गाठणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

महाराष्ट्राने लसीकरणात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर लस वाया जाण्याचं प्रमाणही महाराष्ट्रात कमी आहे. राज्यातील लसीकरण मोहिमेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अभिनंदनही केलं आहे. गुरुवारी 4 लाख 20 हजार 960 नागरिकांना लस देण्यात आली होती. यानंतर लस घेणाऱ्या नागरिकांचा आकडा 2 कोटी 97 लाख 23 हजारांवर पोहोचला होता. शुक्रवार दुपारी 2 वाजेपर्यंत राज्यात झालेल्या लसीकरणानंतर हा आकडा 3 कोटी 27 हजार 217 झाला आहे.

दरम्यान केंद्र सरकारच्या ‘सर्वांसाठी मोफत लसीकरण’ मोहिमेला आता देशभरात सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा फायदा देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि युवकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, तरच आपण कोरोनावर मत करू शकतो, असे मत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!