Share

Heavy Rain | हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’; अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडा

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा डेस्क : मागील ४-५ दिवसांपासून राज्यातील बऱ्याच भागात पाऊस कमी जास्त प्रमाणात सुरु आहे. मात्र आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात येत्या २४ तासात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खूप गरज असल्यासच घराबाहेर पडावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच स्थानिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन नागरिकांनी करावं, असं देखील सांगण्यात आलं आहे. येत्या २४ तासांसाठी हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागराच्या उत्तर-पश्चिम आणि पश्चिम-मध्य भागात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे मुंबईसह मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा भागात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच येते ३ दिवस राज्यात पावसाची स्थिती अशीच राहणार असल्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेरपडू नये. तसेच नदी, नाले आणि धरण क्षेत्र भागात नागरिकांनी पर्यटनासाठी जाऊ नये. पूरस्थिती निर्माण होण्याची भेटी असल्याने नागरिकांनी त्यासंबंधीची सर्व काळजी घ्यावी.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!