Share

BJP State President । आशिष शेलार होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?, सूत्रांची माहिती

Published On: 

🕒 1 min read

BJP State President । मुंबई : एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झाली आहे. यासोबतच मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी विशेष अट घालण्यात आली आहे. त्यानुसार स्वच्छ प्रतिमेच्या आमदारांनाच मंत्रीपद दिले जाणार आहे. पहिल्या विस्तारात केवळ 20 ते 25 मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. अधिवेशनानंतर इतर मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. तसेच पूर्वी जे मंत्री होते, त्यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी दिली जाणार आहे. मात्र, शिंदे सरकारमध्ये भाजपचंच वर्चस्व राहणार आहे.

मात्र एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची खलबत सुरु असताना भाजपच्या गोटातून आणखीन एक बातमी समोर आली आहे. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार आहे. यामुळे पुढील प्रदेशाध्यक्ष कोण होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आता समोर आली आहे. महापालिका निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन शेलारांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

शेलारांना मंत्री करण्यात येणार नसल्याने मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. एक तर भाजपकडे सर्वाधिक अनुभवी नेते आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे अर्थ आणि गृहखाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे. त्यामुळे शिंदे सरकारची आर्थिक नाडी ही फडणवीस यांच्या हातात राहणार असून महत्त्वाची खाती पदरात पडल्याने भाजपकडून निर्णयांचा धडका लावला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विखे पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांना मुंबईत बोलावण्यात आलं आहे. भाजप पक्षश्रेष्ठींचा या आमदारांना फोन गेला आणि त्यांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या आमदारांचं मंत्रिपद निश्चित मानलं जात आहे. दुसरीकडे शिंदे गटाकडूनही गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट, दादा भुसे आणि संदीपान भुमरे यांना फोन गेले आहेत. त्यांना तातडीने मुंबईला बोलावण्यात आलं असून शासकीय निवासस्थानीच थांबण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!