🕒 1 min read
Ajit Pawar। मुंबई : राज्यात एक महिन्याहून अधिक काळ सत्ता स्थापन केल्यानंतरही शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्यात सकाळपासून उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित झाली आहे. यासोबतच मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी विशेष अट घालण्यात आली आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्य सरकारवर वारंवार टीका करणारे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अद्याप काही फोन आलेला नाही. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिल्ली ट्रिप झाली आहे. तसंच आज नंदनवनमध्येही शिंदे आणि फडणवीसांची बैठक झाली आहे. त्यांच्या काही सहकाऱ्यांना फोन गेल्याची आणि त्यांना मुंबईला बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. पण विस्तार असेल तर आम्हाला फोन येतो. तसा फोन किंवा पत्र अद्याप आलं नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, मात्र एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची खलबत सुरु असताना भाजपच्या गोटातून आणखीन एक बातमी समोर आली आहे. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार आहे. यामुळे पुढील प्रदेशाध्यक्ष कोण होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी आशिष शेलार यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आता समोर आली आहे. महापालिका निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन शेलारांकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | मी एकटा मुख्यमंत्री नाही, माझ्याबरोबर असलेले ५० लोक मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे
- BJP State President । आशिष शेलार होणार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष?, सूत्रांची माहिती
- Udayanraje Bhosale | मराठा आरक्षणाच्या फक्त घोषणा होत असतात पण… – उदयनराजे भोसले
- Weight Loss Drinks | वजन कमी करायचं आहे, पण होत नाही? मग ‘ही’ पेय नक्की ट्राय करा
- Eknath shinde and Devendra Fadanvis | मंत्रिपदासाठी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रस्सीखेच! बंड थंड होईल का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

