मुंबई : काल महाराष्ट्रात सर्वोच्च नायालयाने ओबीसी आरक्षणाची सुनावणी केली. यामध्ये राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवाडी नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच भाजपने सुद्धा राज्य सरकारवर आरोप केला आहे की, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देयचे नाही असे राज्य सरकारकडून स्पष्ट दिसत आहे. आता पंकजा मुंडे यांनी देखील भूमिका मांडली आहे.
पंकजा मुंडे –
आज देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे प्रतिक्रिया नोंदविली तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी देखील या सरकारच्या धोरणावर भूमिका मांडली आहे. काल राज्य सरकारने सुप्रीम कोर्टापुढे जी भूमिका मांडली त्यावरून असे स्पष्ट दिसत आहे की, राज्यसरकारचा धक्का नाही ओबीसी आरक्षणाला धोका आहे. असं नसते तर राज्य शासनाने असा ओबड धोबड अह्वाल सादर केला नसता. अहवाल जर गंभीरपणाने तयार केला असता तर सुप्रीम कोर्टाने यावर योग्य भूमिका घेतली असतीच.
तसेच आम्ही सर्वांनी ओबीसी आरक्षणबाबद कोणतही राजकारण करायचं नाही. आरक्षणला सहकार्य करायचं असं सर्वांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे मी आज भूमिका मांडतेय, ती राजकीय भूमिका नाही. ओबीसींच्या राजकीय भविष्यासाठी चिंता करणाऱ्या कार्यकर्त्याची भूमिका मांडत आहे.
महत्वाच्या बातम्या –


