Share

Russia Ukraine war: युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे व्लादिमीर पुतीन यांना खुले आव्हान; म्हणाले…

Published On: 

नवी दिल्ली : सध्या युरोप खंडात युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO या अमेरीका प्रणित लष्करी आघाडीमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. रशियाचे लष्कर हे जगातील सर्वात ताकदवान लष्करापैकी एक आहे. मात्र युक्रेनचे लष्कर रशियाच्या लष्करासमोर दुर्बळ ठरत आहे. रशियाच्या लष्कराने जरी आक्रमक पवित्रा अवलंबविला असला तरी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या नेतृत्वाखाली युक्रेनचे लष्कर सुद्धा जमेल तसा प्रतिकार करत आहे.

रशिया आणि युक्रेन या दोन देशात आत्तापर्यंत युद्ध थांबवण्यासाठी दोन बैठका झाल्या आहेत ; मात्र या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या आहेत. त्यातच आज युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाला पुन्हा एकदा चर्चेचे आमंत्रण दिले आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की आज युक्रेनमधील पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांशी बोलत असताना झेलेन्स्की म्हणाले कि, ” मला खरंच माहिती नाही कि पुतीन कशाला घाबरत आहेत? मी त्यांच्या शेजारी असणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. मी काही चावा घेणारा माणूस नाही. व्लादिमीर पुतीन यांनी आजिबात मला घाबरू नये. रशियाने त्वरित युद्ध थांबवायला हवे आणि युद्ध थांबवायचे असल्यास त्यांनी लवकरात लवकर माझ्याशी चर्चेला सुरुवात करावी असेही युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की आज म्हणाले.

काहीच दिवसांपूर्वी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात युद्ध थांबवावे म्हणून चर्चा झाली. मात्र या चर्चेला पुतीन हे मॅक्रॉन यांच्यापासून ३० मीटर लांब बसले होते. पुतीन यांच्या या ३० मीटर लांब बसण्याच्या मुद्द्यावरून सुद्धा झेलेन्स्की यांनी पुतीन यांच्यावर निशाणा साधला आहे. झेलेन्स्की आज युक्रेनमध्ये पत्रकारांशी बोलत होते तेव्हा त्यांनी पुतीन यांच्यावर वरील टीका केली.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!