मुंबई : ओबीसी आरक्षण नाही मिळाले तर एकही निवडणूक होता कामा नये अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी कालच्या आरक्षणाच्या मुद्यावरून ठाकरे सरकारला चांगले फैलावर घेतले आहे. लोकांच्या व आमच्या समाधानासाठी मंत्रिमंडळाचे ठराव करू नका, मंत्रिमंडळाचे ठराव मांडायचे असेल तर अंमलबजावणी केली जाईल याचा विचार करूनच ठराव मांडा, अशी मागणी फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे केली आहे.
येणाऱ्या काळात दोन तृतीयांश निवडणुका होणार आहेत. जर या निवडणुका झाल्या तर परत कधीच ओबीसी आरक्षण मिळणार नाही. अशी भीती फडणवीस यांनी दाखविली आहे. जे काही पाऊल उचलायचे आहे ते आताच उचला, जो काही कायदा करायचा असेल तर आताच करा. चर्चा करायच्या असतील तर आता करा, यावर मार्ग काढा अशी मागणी ठाकरे सरकारकडे केली आहे.
देवेंद्र फडणवीस –
फडणवीसांच्या मते काल सर्वोच्च न्यायालयात राजकीय आरक्षण पूर्णपणे संपल आहे. काल राज्यसरकारचं हसू झाले आहे असेही बोलले. १३ डिसेंबर २०१९ रोजी डेडीकेटेड कमिशन तयार करून राज्यसरकारला ओबीसीचा इम्पेरीकल डाटा तयार करायला लावला होता. पण मागच्या सव्वादोन वर्षात एका पैशाच काम केले नसल्याचे देवेंद्र फडणवीस बोलले. तसेच कोर्टाने अहवाल सादर करण्याची परवानगी दिली होती, पण एकप्रकारची अहवालाची थट्टा उडवली गेली असेही बोलले.
महत्वाच्या बातम्या –


