मुंबई: भारताची वेस्ट इंडीज विरुद्ध टी २० मालिका सुरु होणार आहे . भारताने एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली आहे. टी २० मालिका सुरु होण्यापूर्वी टीम इंडिया मज्जा करताना दिसत आहे. शिखर धवन , कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांचा हा मज्जा करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
धवन, चहल आणि यादव यांच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते एका मजेदार डायलॉगवर लिप सिंक करताना दिसत आहेत. या त्रिकुटाने काही ऑन-पॉइंट एक्सप्रेशन्स दिले आणि व्हिडिओ अधिक मजेदार बनवला. यात युजवेंद्र चहल लिंबू सुद्धा खात आहे. दीपक हुड्डाने हा व्हिडिओ शूट केला आहे. गब्बर आणि कुलचा यांचा हा व्हिडीओ चाहत्यांना पसंतीस पडत आहे.
https://www.instagram.com/reel/CZ_njCKKFXV/?utm_source=ig_web_copy_link
भारतीय संघ पहिला सामना बुधवारी खेळणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध हि तीन सामन्याची टी २० मालिका आहे. वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाल्यानंतर कुलदीप यादवला संघात जागा मिळाली आहे. बऱ्याच काळापासून खराब फॉर्म चा सामना करत असलेल्या कुलदीप साठी हि कामगिरी सुधारण्याची चांगली संधी असेल.
महत्वाच्या बातम्या
- अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न! आरोपी म्हणाला, “शरीरात एक चिप आहे, मी रिमोटवरून…”
- सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा न्यूझीलँडकडून पराभव
- पक्ष प्रवेशावरून आमदार मंदा म्हात्रे यांचा आमदार गणेश नाईकांना टोला
- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ उघड करणार सर्व गुपिते! ED ने मागितली कोठडी
- ‘याला म्हणतात मावळा’; अमोल कोल्हे बैलगाडा शर्यतीत घोडीवर स्वार


