Share

अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न! आरोपी म्हणाला, “शरीरात एक चिप आहे, मी रिमोटवरून…”

Published On: 

नवी दिल्ली : दिल्लीतील सर्वात सुरक्षित क्षेत्र असलेल्या लुटियंस झोनमध्ये राहणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारतीय गुप्तचर यंत्रणेचे सर्वोच्च अधिकारी अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. बुधवारी सकाळी एका व्यक्तीला सुरक्षा कठडा तोडण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आले. त्यानंतर तो म्हणाला की त्याच्या शरीरात एक चिप आहे, मला रिमोटवरून नियंत्रित केले जात आहे. सध्या दिल्ली पोलिसांचे विशेष पथक त्याची चौकशी करत आहेत.

चौकशीत आरोपीने सांगितले की, तो कर्नाटकचा रहिवासी असून भाड्याने गाडी चालवत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मानसिक स्थिती ठीक नव्हती. तो चुकून लुटियंस झोनमध्ये पोहोचला होता की यापेक्षा मोठा कट होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अजित डोवाल लुटियंस झोनमधील ५ जनपथ बंगल्यात राहतात. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदरकुमार गुजराल येथे राहत होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा बंगलाही डोभाल यांच्या बंगल्याला लागून आहे.

२०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईकची योजना आखली होती. ही योजना आखण्यात डोवाल यांचा महत्वाचा वाटा होता. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी LOC ओलांडून बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. डोभाल यांच्याबद्दल हेही प्रसिद्ध आहे की ते सुमारे ७ वर्षे पाकिस्तानमध्ये गुप्तहेर होते. याशिवाय ऑपरेशन ब्लू स्टार आणि ब्लू थंडरमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!