Share

IND vs WI: अर्धशतक झाल्यानंतर सूर्याचे सेलिब्रेशन व्हायरल!

Published On: 

मुंबई: भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध टी २० मालिका ३-० ने जिंकली आहे. याआधी भारताने एकदिवसीय मालिकेतही वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप केले होते. भारतने जिंकलेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवने प्रमुख भूमिका निभावली आहे. त्याने ३१ चेंडूत ६५ धाव केल्या आहेत. यावेळी सूर्याने अर्धशतक पूर्ण झाल्यावर एका वेगळ्या प्रकारचे सेलेब्रेशन केले आहे. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार यादवचे (suryakumar yadav) सेलिब्रेशन त्याच्या शॉट मेकिंगसारखेच धमाकेदार होते. ५० धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर, डग-आउटच्या दिशेने आपली बॅट दाखवली . मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला उभे राहून अभिवादन केले, तर कर्णधार रोहित शर्मा सूर्यकुमारच्या कामगिरीने खूप खूश होता. सूर्याने हात जोडून ‘नमस्ते’ करत सेलिब्रेशन केले आहे. त्याचा व्हिडीओ काही क्षणातच व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/SportsHustle3/status/1495422405031849984?s=20&t=K8iopyhmMMzVx11xyn3bYg

सूर्यकुमार यादवला या मालिकेतील अप्रतिम कामगिरीसाठी सामनावीर आणि मालिकावीर या दोन्ही पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. सूर्याने मिळालेल्या पुरस्कारांबाबत आनंद व्यक्त केला आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठीही सूर्याची टीम इंडियात निवड झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!