Share

नारायण राणेंना केंद्राचा जोर का झटका! सिंधुदुर्गातील चिवला बीचवरील ‘नीलरत्न’ बंगल्यावर कारवाईचे आदेश

Published On: 

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांना केंद्राने चांगलाच दणका दिला आहे. त्यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिवला बीचवरील ‘नीलरत्न’ बंगल्यावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. (Neelratna Bungalow on Chivla Beach in Sindhudurg) केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इंन्वायरमेंट, फ़ॉरेस्ट आणि क्लायमेंट चेंजच्या नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल झोन प्राधिकरणाला याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राणे आता अडचणीत आले आहेत.

दरम्यान नारायण राणे यांनी चिवला बीचवरील अनधिकृत “नीलरत्न बंगला” (CRZ-2)सी. आर. झेड.-2 चे उल्लंघन करून बांधला असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी लिहिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे राणे नीलरत्न बंगाल्यामुळे पुन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.

तसेच जुहूच्या समुद्राजवळील असलेले ‘आधीश’ नावाचे ७ मजली बंगलेही अनधिकृतपणे बांधले असल्याचे प्रदीप भालेकर यांनी म्हटले आहे. तसेच बंगले बांधताना उच्च एफएसआय वापरून महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवला गेला आहे. त्यामुळे या दोन अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे राणेंच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!