Share

“साहाने वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक करायला नको होत्या” सौरव गांगुलीच्या भावाचे वक्तव्य

Published On: 

मुंबई: श्रीलंका दौऱ्यावर निवड न झाल्याने नवा वाद सुरु झाला आहे. रिद्धिमान साहाने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर वचन न पाळल्याचा खुलासा केला होता. यानंतर आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी) चे सचिव आणि सौरव गांगुलीचे मोठे बंधू स्नेहशिष गांगुली म्हणाले की रिद्धिमान साहाने त्याच्या आणि निवडकर्त्यां/बीसीसीआयमधील खाजगी संभाषणावर सार्वजनिकपणे टिप्पणी करून चूक केली आहे.

सौरव गांगुली आणि त्याच्यामधील झालेल्या संभाषणाबाबत साहाने सांगितले होते. यावर स्नेहशीष म्हणाले “हे माझे वैयक्तिक मत आहे, परंतु मुख्य निवडकर्ता/बीसीसीआयने साहाला जे सांगितले ते खाजगी होते.त्याने या गोष्टी सार्वजनिक करायला नको होत्या. तसेच, तो रणजी करंडकही खेळू शकला असता. त्यांनी माघार घेण्यामागे वैयक्तिक कारणे सांगितली आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे. त्याच्यासाठी दार सदैव उघडे असते, जेव्हा त्याला संघात सामील व्हायचे असेल तो येऊ शकतो”

सौरव गांगुलीने रिद्धिमान साहाला न्यूझीलँडमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर अभिनंदनपार मेसेज केला होता. ज्यात त्यांनी साहाला ते बीसीसीआय असे पर्यंत संघात स्थान देईल असे सांगितले होते. मात्र आता अवघ्या काही महिन्यात साहाला संघातून बाहेर काढले गेले आहे. या सगळं खुलासा साहाने श्रीलंका दौऱ्याची घोषणा झाल्यानंतर केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!