जिनिव्हा: कोरोना या जागतिक महासाठी मध्ये जागतिक आरोग्य संघटना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या काळामध्ये भारताने देखील डब्लुएचओच्या कामामध्ये तितकेच योगदान दिले आहे. या दरम्यान भारताचे केंद्रिय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची २२ मे २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनतर आता आणखी एका भारतीयाची डब्लुएचओच्या महत्त्वाच्या पदी नियुक्ती झाली आहे. आरोग्य विषयक समस्यांना तोंड देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं या जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची निर्मिती केली आहे. भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अनिल सोनी यांना जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आलं आहे. अनिल सोनी हे या संघटनेचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आहेत.
अनिल सोनी यांच्याकडे १ जानेवारीपासून मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार दिला जाणार आहे. या दरम्या त्यांची लक्ष्य आरोग्य क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा असणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं करोना महासाथीच्या दरम्यान मे २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटना फाऊंडेशनची सुरूवात केली होती. आतापर्यंत अनिल सोनी हे ग्लोबव हेल्थकेअर कंपनी वियाट्रिस सोबत कार्यरत होते. ते ‘ग्लोबल इन्फेक्शन डिजिज’चे प्रमुख म्हणून वियाट्रिसमध्ये सेवा बजावत होते.
The WHO Foundation @thewhof has appointed @_AnilSoni as its inaugural CEO.
The Foundation, an independent grant-making agency, was launched in May 2020 to work alongside WHO & the global health community to address the world’s most pressing global health challenges. pic.twitter.com/BrQtxg34Gc— World Health Organization (WHO) (@WHO) December 7, 2020
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस यांनी अनिल सोनी यांच्या कार्याची स्तुती केली आहे. तसंच सोनी हे आरोग्य क्षेत्रातील समस्यांचं निराकरण करण्यासाठी नवे प्रयोग करणारे असल्याचंही म्हटलं आहे. आज संपूर्ण जग कठीण वेळेतून पुढे जात आहे. अशात त्यांचे नवे विचार त्याचा सामना करण्याची संधी देणार असल्याचंही ते म्हणाले. यापूर्वी अनिल सोनी हे क्लिंटन हेल्थ अॅक्सेसमध्येही कार्यरत होते. २००५ ते २०१० या कालावधीत त्यांनी या ठिकाणी सेवा बजावली. याव्यतिरिक्त सोनी यांनी बिल आणि मलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या आरोग्य विभागातही कार्यभार सांभाळला होता. त्यांनी एचआयव्हीच्या उपचारांमध्येही मोलाची भूमिका बजावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- घटस्फोट घेण्याच्या निर्णयानंतर IAS टीना डाबी यांनी शेअर आपल्या भावना
- खुशबू, उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्रीने सोडली कॉंग्रेसची साथ
- आता सरनाईक कुटुंबाने तयार राहावं! : किरीट सोमय्या
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- शरद पवार राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले, थोरातांचा शरद पवारांना टोला


