मुंबई : भारताला इंग्लंडविरुद्ध दुसरा टी-२० सामना शनिवारी खेळायचा आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात विराट कोहली, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू संघात पुनरागमन करत आहेत. आता या वरिष्ठ खेळाडूंच्या आगमनामुळे संघ व्यवस्थापनासह कर्णधार रोहित शर्मा यांना दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची निवड करणे कठीण होणार आहे. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघातील अनेक युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली होती. अशातच आता या युवा खेळाडूंना बाहेर बसवण्याचा निर्णय घेणे व्यवस्थापनासाठी कठीण असणार आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विराट कोहली, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे पक्के आहे. इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वानचे मत आहे की, विराट कोहली प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला तर त्याने इशान किशनच्या जागी रोहित शर्मासह संघासाठी सलामी द्यावी. तर तिसर्या आणि चौथ्या क्रमांकावर दीपक हुडा आणि सूर्यकुमार यादवसह डाव खेळावा. सोनी स्पोर्ट्सवर बोलताना स्वान म्हणाला की, ‘विराट कोहली परतला तर तो इशान किशनच्या जागी रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो. मात्र हे माझे वैयक्तिक मत आहे त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन त्यांना जे योग्य वाटेल तो निर्णय घेतील.’
विराट कोहलीने सलामीला का फलंदाजी करावी? यावर स्वानने सांगितले की, ‘जेव्हा तुमच्याकडे विराट कोहलीसारखा महान खेळाडू असेल तेव्हा तुम्हाला त्याने मधल्या षटकांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी असे वाटत नाही कारण तो इतक्या वेगाने धावा करणार नाही. दीपक हुडा किंवा सूर्यकुमार यादव हे गोलंदाजांवर लवकर आक्रमण करतील, पण विराट कोहलीचा खेळ जरा वेगळा आहे. दीपक हुडा आणि सूर्यकुमार यादव तर कोहली आणि रोहित यांनी एकत्र चांगली भागीदारी केल्यास मधल्या फळीतील फलंदाज विरोधी संघासाठी धोकादायक ठरू शकतात. जर रोहित दुसर्या टोकाला इतकी चांगली फलंदाजी करत असेल आणि लवकर धावा करत असेल, तर विराट त्याला फॉलो करेल आणि तेच करेल. कल्पना करा की कोहली आणि रोहित शर्मा शीर्षस्थानी मोठी धावसंख्या करत आहेत. त्यानंतर हुडा आणि सूर्यकुमार यादव येतील. अशा शब्दांत स्वानने भारतीय संघाविषयी आपले मत व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

