मुंबई: भारतीय संघाची श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी घोषणा झाली आहे. ज्यात अधिकृतपणे रोहित शर्माला सगळ्या फॉरमॅट मधील कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर एकेकाळी भारतीय संघाच्या कसोटी संघाचे महत्वाचे भाग राहिलेले अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना खराब फॉर्ममुळे संघातून वगळण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील त्यांच्या खराब कामगिरीवरून त्याच्यावर बरीच टीका झाली होती. त्यामुळे त्यांचे संघातील स्थान अनिश्चित होते. ते दोघेही सध्या रणजी ट्रॉफी मध्ये खेळत आहेत. अजिंक्य रहाणेने नुकतेच शतकही झळकावले. मात्र निवडकर्त्यांनी आधीची कामगिरी लक्षात घेता त्यालाही संघात स्थान न देण्याचे ठरवले आहे. यात यष्टीरक्षक रिद्धीमान सहा आणि ईशान शर्मालाही संघात जागा मिळाली नाही.
मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी खेळाडूना संघात न समविष्ट केल्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले “निवड समितीने निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार केला. आम्ही त्यांच्याशी आधी बोललो. आम्ही त्यांना सांगितले की आम्ही श्रीलंकेसाठी २ कसोटी सामन्यांसाठी त्यांचा विचार करणार नाही. आम्ही त्यांना सांगितले की त्यांच्यासाठी दरवाजे पूर्णपणे खुले आहेत. केवळ २ कसोटी सामन्यांमध्ये निवडकर्त्यांनी इतर क्रिकेटपटूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.”
महत्वाच्या बातम्या
- ऋषभ पंत नाही तर ‘हा’ वेगवान गोलंदाज असेल भारतीय संघाचा उपकर्णधार
- बीसीसीआयची घोषणा! रोहित शर्मा आता सर्व फॉरमॅटमधील कर्णधार
- प्रवीण दरेकरांच्या जीवाच बर वाईट झालं तर सरकार जबाबदार असेल – प्रसाद लाड
- MUMBAI | विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनाला पुन्हा अपघात
- रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है ; संजय राऊतांनी विरोधकांना फटकारले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

