🕒 1 min read
मुंबई: रणजी ट्रॉफी मधील दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यातील सामन्यात युवा खेळाडू शाहरुख खानने अवघ्या १४८ चेंडूत १९४ धावा केल्या आहेत. पंजाब किंग्जच्या या खेळाडूने त्याच्या राज्य संघ तामिळनाडूला मजबूत स्थितीत आणत दिल्लीविरुद्ध लढत आहे. तसेच शाहरुख खानचे हे डोमेस्टिक क्रिकेटमधील पहिले शतक होते.
तामिळनाडू संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी निवडली. त्यांच्याकडून प्रथम बाबा अपरजितने ११७ धावा केल्या. पण नंतर दिल्लीच्या गोलंदाजीच्या चांगल्या प्रदर्शनानंतर तामिळनाडूने लंचपर्यंत १६२-५ अशी मजल मारली. शाहरुख खान ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. शाहरुखने येताच सर्व दडपण विसरून परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आणि दिल्लीच्या गोलंदाजांना घाम आणला. १९४ धावांच्या ग्लॅमरस खेळीत त्याने १० वेळा चेंडू सरळ बाऊंड्री बाहेर फेकले तर २० चौकार मारले.
Etharkkum Thunindhavan ????
Maiden First Class ???? for SRK ????#RanjiTrophy2022 #WhistlePodu ???????? @shahrukh_35 pic.twitter.com/Va9IMFo33z— Chennai Super Kings (@ChennaiIPL) February 19, 2022
Shahrukh khan tearing Delhi bowlers left right and center. He is playing in beast mode. Playing Ranji trophy in IPL mode ???????? I think he has started his IPL preparation already. @BCCIdomestic @shahrukh_35 super fantastic knock
— Ganesh Srini (@Ganeshsrini2) February 19, 2022
शाहरुख खानला नुकतेच पंजाब किंग्सने आयपीएलमध्ये ९ कोटीमध्ये आपल्या संघात घेतले आहे. शाहरुख साठी अनेक संघानी मोठ्या बोली लावल्या होत्या. शाहरुखने आता रणजी ट्रॉफी मध्ये शानदार प्रदर्शन करत आपली प्रतिभा जगाला दाखवून दिली आहे. आयपीएल सुरु व्हायला अवकाश असला तरी शाहरुखचे रणजी मधील कामगिरी त्याला आयपीएल मध्येही मदत करेल.
महत्वाच्या बातम्या
- लाव रे तो व्हिडीओ..! विनायक राऊतांचा नारायण राणेंवर हल्लाबोल!
- खराब फॉर्मला दिलासा नाही! पुजारा आणि रहाणेला श्रीलंकाविरुद्ध मालिकेतून वगळले
- ऋषभ पंत नाही तर ‘हा’ वेगवान गोलंदाज असेल भारतीय संघाचा उपकर्णधार
- बीसीसीआयची घोषणा! रोहित शर्मा आता सर्व फॉरमॅटमधील कर्णधार
- प्रवीण दरेकरांच्या जीवाच बर वाईट झालं तर सरकार जबाबदार असेल – प्रसाद लाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
