Share

IPL 2022 : CSK पाठोपाठ टीम इंडियालाही धक्का..! आता काय करणार रोहित शर्मा?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आता आयपीएलनंतर टी-२० विश्वचषकातून बाहेर पडू शकतो. रिपोर्ट्सनुसार, दीपक चहरची दुखापत खूप गंभीर आहे, त्यामुळे तो चार महिन्यांपासून मैदानापासून दूर आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, या कारणामुळे तो टी-२० वर्ल्डकपमधूनही बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मापुढे नवा पेच निर्माण झाला आहे.

दीपक चहर संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. चहर या आठवड्यापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज संघात सामील होण्याची अपेक्षा होती परंतु आता तो नवीन दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलमधून बाहेर पडला आहे. तो अजूनही एनसीएमध्ये आहे आणि त्याच्या फिटनेसवर काम करत आहे.

आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनदरम्यान, दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्जने १४ कोटी रुपयांना पुन्हा विकत घेतले. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेदरम्यान चहरला दुखापत झाली आणि त्यामुळे तो श्रीलंका मालिकेतूनही बाहेर पडला. त्यानंतर त्याला आयपीएलमधूनही बाहेर व्हावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!